लोकपालाच्या मसुद्याला पंतप्रधानांची सहमती

December 20, 2011 12:12 PM0 commentsViews:

20 डिसेंबर

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोकपालाच्या मसुद्याला सहमती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्र्यांनी काल हा मसुदा तयार केला होता. आता आज संध्याकाळी होणार्‍या कॅबिनेटच्या बैठकीत या मसुद्यावर चर्चा होणार आहे.

या मसुद्यात कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत ?

- CBI संचालक निवड समितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश- लोकपाल सीबीआयकडे भ्रष्टाचाराच्या केसेस वर्ग करू शकतं आणि तपास कसा सुरु आहे त्यावर देखरेखही करू शकतं. लोकपाल ही अर्ध न्यायीक संस्था असेल. – कारवाईचे संचालनालय सीबीआयकडेच राहील आणि वेगवेगळ्या तपास यंत्रणांना दिलेली व्हिजीलन्स पॉवर त्या त्या यंत्रणांकडेच असतील- लोकपालला जर एखाद्या कामात चौकशी करायची असेल तर त्यांची परवानगी त्याना केंद्रीय दक्षता आयोगाकडून घ्यावी लागले- लोकपाल सुमोटोचा अधिकार असणार नाही- लोकपालकडे केल्या गेलेल्या तक्रारींवरच लोकपाल चौकशीची कारवाई करू शकतं.

close