काका विरोधात पुतण्याने थोपाटले दंड

December 21, 2011 9:55 AM0 commentsViews: 7

20 डिसेंबर

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष पेटला आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि त्यांचे पुतणे आमदार धनंजय मुंडे याच्यात गेल्या काही दिवसात सुरु असलेला वाद आता चव्हाट्यावर आला आहे. परळीतील नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीवरून आता हे काका पुतणे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे. गोपीनाथ मुंडे यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करताना विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे नाराज झालेल्या धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या उमेदवाराविरो़धात धनंजय मुंडेंनी आपला उमेदवार उभा केला आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपला काठावरचं बहुमत मिळालं होतं. 32 पैकी भाजपला 17 जागा मिळाल्यात. यात अनेक नगरसेवक धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत. त्याचबरोबर एक अपक्ष नगरसेवकही धनंजय मुंडे यांचा समर्थक आहे.

काका X पुतण्या

- धनंजय मुंडेंचा 14 समर्थकांना उमेदवारी देण्याचा आग्रह- पण प्रत्यक्षात मिळाल्या 8 जागा – या 9 जागांसह एकूण 17 जागा धनंजय मुंडेंनी राखल्या- भाजपने परळीमध्ये 32 पैकी 17 जागा जिंकल्या- परळीच्या नगराध्यक्षपदासाठी वाद- नगराध्यक्षपदासाठी गोपीनाथ मुंडेंकडून जुगलकिशोर लोहियांचे नाव- धनंजय मुंडेंचा बाजीराव धर्माधिकारी आणि दीपक देशमुखांसाठी आग्रह- जुगलकिशोर लोहिया यांनी अर्ज केला दाखल- बाजीराव धर्माधिकारी आणि दीपक देशमुख यांचेही अर्ज दाखल – काँग्रेसचे टी.पी. मुंडे आणि राष्ट्रवादीचे फुलचंद कराड धनंजय मुंडेंसोबत- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी नाव नाही

close