लोकपालसाठी कोणत्याही लढाईला तयार – सोनिया गांधी

December 21, 2011 9:29 AM0 commentsViews: 3

21 डिसेंबर

आम्ही लोकपालसाठी कोणत्याही लढाईला तयार आहोत. सरकारने एक चांगले विधेयक आणले आहे.आता ते विरोधकांनी आणि टीम अण्णांनीसुद्धा मंजूर केलं पाहिजे असं स्पष्ट मत काँग्रेसअध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं. आज काँग्रेसच्या संसदीय बैठक पार पडली याबैठकीत त्या बोलत होत्या. लोकपाल विधेयकाची परिस्थिती महिला आरक्षणाच्या विधेयकाप्रमाणचे होईल का असा प्रश्न आयबीएन नेटवर्कने विचारला असता आम्ही दोन्ही विधयेक मंजूर होण्यासाठी लढाई करायला तयार आहोत असं सोनिया गांधी म्हणाल्यात. विरोधक सातत्याने संसदेच्या कामकाजात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. अन्न सुरक्षा विधेयकासंदर्भातही त्यांचा तोच प्रयत्न आहे असा आरोपही सोनियांनी केला.

दरम्यान, सरकारच्या या लोकपालवर अण्णांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने पुन्हा एकदा जनतेची फसवणूक केली आहे अशी टीका अण्णांनी केली. तर सरकारने आणलेला लोकपाल मसुदा अजून पाहिलेला नाही. मात्र ज्या बातम्या आलेल्या आहेत त्यावरून हे लोकपाल कमकुवत आहे.आणि सरकार फक्त दिखावा करतंय अशी टीका टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी केली.

close