उरळीमध्ये गावकर्‍यांनी अडवल्या कचर्‍याचा गाड्या

December 21, 2011 9:43 AM0 commentsViews: 1

21 डिसेंबर

पुणे महापालिकेने कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यायी व्यवस्था करू असं आश्वासन दिलं होतं. पण हे आश्वासन पूर्ण केलं नसल्याचा निषेध करत उरळी आणि फुरसुंगीच्या गावकर्‍यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. इथे येणार्‍या सगळ्या कचर्‍याच्या गाड्या नागरिकांनी आज सकाळपासून अडवल्या आहेत. शहराच्या कचर्‍याचे डंपिंग उरळीला केलं जातं. या प्रकल्पाला कॅपिंग करू तसेच कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यायी व्यवस्था करू, अशी आश्वासनं महापालिकेंनं गावकर्‍यांना दिली होती. पण वर्ष उलटलं तरी ही आश्वासन पूर्ण करण्यात आली नाहीत. त्यामुळे या गावकर्‍यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असं नागरिकांनी स्पष्ट केलं आहे.