योगिता ठाकरे मृत्यूप्रकरणीची पुन्हा चौकशी करा : नागपूर कोर्ट

December 21, 2011 10:53 AM0 commentsViews: 4

21 डिसेंबर

योगिता ठाकरे मृत्यूप्रकरणी सीआयडीला चौकशी पुन्हा सुरू करण्याचे आदेश नागपूर कोर्टाने दिले आहेत. मे 2009 मध्ये भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या घराशेजारी एका गाडीत योगिता मृतावस्थेत आढळली होती. योगिताचा गाडीत गुदमरून मृत्यू झाला अस प्राथमिक अहवालता सांगण्यात आलं होतं. याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला होता मात्र ठोस पुरावे हाती न लागल्यामुळे फाईल बंद केली होती. मात्र योगिताची हत्या करण्यात आल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. आज नागपूर कोर्टाने पुन्हा एकदा नव्याने तपास करणात यावा अशा सुचना सीआयडीला दिल्या आहे.

close