मध्यप्रदेशात आदिवासींचा कौल महत्त्वाचा

November 19, 2008 7:45 PM0 commentsViews: 4

19 नोव्हेंबर मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत आदिवासी मतांचा कौल नेहमीच महत्त्वाचा ठरला आहे. आदिवासी मतांचं संख्याबळ बघता ते कोणत्याही पक्षाला सत्तेवर येण्यास महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.मध्यप्रदेशमध्ये एकूण मतांपैकी 25 टक्के मतं आदिवासींची आहेत. त्यामुळे ही मतं आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.मतांच्या लढाईत प्रत्येक मताला महत्त्व असतं. 2003 च्या विधानसभा निवडणुकीत आदिवासींमध्ये जोरदार पकड असलेल्या गोंडवाना गणतंत्र पक्षाला केवळ 3 जागा जिंकता आल्या. उर्वरित मते भाजप आणि कॉग्रेसमध्ये विभागली गेली होती. विशेषतः कॉग्रेसपक्ष हा प्रामुख्यानं आदिवासी मतांवर जास्तीत जास्त विसंबून राहतो. यावेळी गोंडवाणा गणतंत्र पक्षानं राज्यातून सुमारे 150 उमेदवार उभे केलेत. आदिवासींची संख्या बघता यावेळी निवडणुकीच्या मैदानात दोन नवे आदिवासी पक्ष समोर आले आहेत. गोंडवाना मुक्ती संघटना आणि राष्ट्रीय गोंडवाना पक्ष असं या पक्षांची नावं आहेत. या दोन नव्या पक्षामुळे कॉग्रेसची काळजी वाढली आहे. यामुळे भाजप आणि काँग्रेसची निवडणूक समीकरणं बिघडू शकतात. कॉग्रेसनं गोंडवाना गणतंत्र पक्षात फूट पाडल्यामुळे या पक्षाची राजकीय सौदेबाजीची क्षमता कमी झाली असल्याचं ब-याच जणाचं म्हणणं आहे. मात्र सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी या पक्षाची मदत कॉग्रेसला होवू शकते.

close