सरकारी लोकपाल हा डाकपाल – केजरीवाल

December 22, 2011 10:04 AM0 commentsViews: 2

22 डिसेंबर

सरकार नवं लोकपाल विधेयक आज संसदेत सादर करणार आहे ते कमकुवत आहे सरकारला भ्रष्टाचार मिटवायचा नाही उलट सरकारला सर्व जनता भ्रष्टाचारी वाटत आहे असं हे विधेयक तयार करण्यात आलं आहे. ऑगस्टमध्ये तयार करण्यात आलेल्या विधेयकापेक्षाही हे विधेयक खराब आहे. यामुळे केवळ 10 टक्के नेते, 5 टक्के कर्मचारी या लोकपालमध्ये येत आहे त्यामुळे लोकपालला कोणतेचं अधिकार दिले नाही. लोकपाल हा पोस्ट ऑफिसचं काम करणार आहे अशी घनाघाती टीका टीम अण्णांचे मुख्य सदस्य अरविंद केजरीवाल यांनी केली. तसेच सरकारने हे विधेयक मागे घ्यावे असंही सांगितले. येत्या 27 डिसेंबरला मुंबईत आझाद मैदानावर अण्णांचे उपोषण होणार आहे अशी माहितीही केजरीवाल यांनी दिली.

close