मस्जिद बंदरजवळ लोकलचा डबा घसरला ; वाहतूक कोलमडली

December 21, 2011 11:06 AM0 commentsViews: 3

21 डिसेंबर

मुंबईत आज सकाळी आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि मस्जिद बंदर दरम्यान एका लोकल ट्रेनचा लेडीज डब्बा ट्रॅकवरुन घसरला आणि त्यानंतर ट्रेनचं वेळापत्रकही घसरलं आहे. या अपघातात कोणीही जखमी झालं नाही पण आता त्यानंतर पूर्ण मध्य रेल्वे मार्गावर या अपघाताचा परिणाम दिसत आहे. अपघातानंतर सहा तास उलटून गेले तरी सेंट्रल रेल्वेच्या गाड्या अजूनही अर्धा तास ते चाळीस मिनिटं उशिराने धावत आहे.

close