केजरोडवर टेम्पो – कारची धडक ; अपघातानंतर कार जळून खाक

December 22, 2011 10:45 AM0 commentsViews: 4

22 डिसेंबर

औरंगाबाद-केज रस्त्यावर टेम्पो आणि सॅन्ट्रो कारची समोर धडक भीषण धडक झाली. या अपघातानंतर सॅन्ट्रो कारने पेट घेतला. या गाडीत असलेले चार जण या अपघातात जखमी झाले आहेत. त्यातल्या दोघांची प्रकृती गंभीर आहेत. चौघंही जण एकाच कुटुंबातले आहेत. हे सर्व लोक औरंगाबादहून केजकडे निघाले होते.अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते अधिक चौकशी करत आहे.

close