पुण्याजवळील सुब्रोतो रॉय स्टेडियमचे उद्घाटन

December 21, 2011 12:06 PM0 commentsViews: 7

21 डिसेंबर

पुण्यातल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सहाराचे सर्वेसर्वा सुब्रोतो रॉय यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या स्टेडियमचे आज उद्घाटन झालं. पुण्यापासून 20 किलोमीटर अंतरावर पुणे – मंुबई एक्सप्रेस हायवेला लागून असलेल्या गहुंजे गावात हे अद्ययावत स्टेडिअम उभारण्यात आलेलं आहे. या स्टेडिअममध्ये आज 21 डिसेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश या रणजी क्रिकेट मॅच होणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हाय वेला लागून असलेलं हे स्टेडियम पुण्यापासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे. अनेक कारणांनी हे स्टेडिअम गेल्या काही वर्षांपासून रखडलं होतं. आयपीएलमधल्या पुणे टीमलाही गेल्या वर्षी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडिअमवर खेळावलं लागलं होतं. पण पुणे टीमलाही अखेर त्यांचं हक्काचं स्टेडिअम मिळालं आहे. या स्टेडिअमवर रणजी, आयपीएल तसेच आंतरराष्ट्रीय मॅचही खेळवल्या जाणार आहे.

close