धनंजय मुंडे यांच्या बंडामागे अजितदादांचा हात ?

December 22, 2011 10:57 AM0 commentsViews: 1

22 डिसेंबर

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी बंड पुकारला आहे. मात्र या बंडामागे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हात असल्याचा आरोप गोपीनाथ मुंडेंच्या गटाने केला आहे. परळीतल्या जवळपास 10 नगरसेवकांना धनंजय मुंडे यांनी पुण्यातल्या एका आलिशान हॉटेलमध्ये डांबून ठेवल्याचा आरोपही गोपीनाथ मुंडेंच्या समर्थकांनी केला. या बंडाची सगळी सूत्रे अजित पवारांनीच हलवली असा आरोप गोपीनाथ मुंडेंच्या समर्थकांनी केला आहे. काका विरुध्द पुतण्या वादावर नितिन गडकरी यांच्या नागपूर येथील निवास्थानी काल बैठक झाली. आयबीएन लोकमतचे आमचे आमचे प्रिन्सिपल करस्पाँडंट आशिष जाधव यांनी मंुडेशी याबद्दल बातचीत केली मात्र आपल्याला या विषयावर काहीही बोलायचं नाही, असं गोपीनाथ मुंडे म्हणाले आहे.

close