अण्णांचे उपोषण आझाद मैदानावर होणार ?

December 21, 2011 12:37 PM0 commentsViews: 3

21 डिसेंबर

मुंबईतील एमएमआरडीएचे बीकेसी मैदानावर उपोषणासाठी असलेलं भाडं परवडणारं नाही त्यामुळे आझाद मैदानात उपोषण करण्याचा पर्याय अण्णा हजारे स्वीकारण्याची शक्यता आहे. कोणतंही फाईव्ह स्टार उपोषण करणार नाही असं अण्णांनी यावेळी स्पष्ट केलं. सरकार कोणतीही सवलत देणार नसेल तर बीकेसी मैेदानाचा वापर करणार नाही. त्यामुळे आझाद मैदानावर उपोषण करु अस टीम अण्णांनी म्हटलं आहे. 3 दिवसासाठी 17 लाख जास्त होत आहे, आणि कोणत्याही देणगीकडून पैसै स्विकारणार नसल्याचेही अण्णांनी स्पष्ट केलं.

close