सिंचनप्रश्नी विधानसभेत प्रचंड गोंधळ

December 21, 2011 1:40 PM0 commentsViews: 5

21 डिसेंबर

विदर्भातील सिंचनाचा प्रश्न आणि त्यात झालेला हजारो कोटींचा घोटाळा यावरून विरोधकांनी आज विधानसभेत सरकारला धारेवर धरलं. या मुद्दयावरून प्रचंड गोंधळ झाला. अखेर विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांमधील काम सुरू न झालेल्या वाढीव रकमेच्या सिंचन निविदा रद्द करण्याची घोषणा जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांना करावी लागली. यावेळी गेल्या 7 वर्षात विदर्भाला 19 हजार 947 कोटी रूपयांचा सर्वाधिक सिंचन निधी देण्यात आला आहे. तसेच 2009 पर्यंत विदर्भाचा आर्थिक अनुशेष हा 788 कोटी रूपयांचा असून भौतिक अनुशेष हा 1109 हेक्टरचा आहे अशी माहिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. पण सरकारचे हे उत्तर फसवे आणि जनतेची दिशाभूल करणारे आहे असा आरोप विरोधीपक्षांनी केला. त्याचबरोबर विदर्भ सिंचन प्रकल्पांची सीबीआय चौकशी करावी अशी मागणीसुद्दा विरोधकांनी केली आहे.

close