साईडबॉटम दुखापतींनी त्रस्त

November 19, 2008 6:10 PM0 commentsViews: 1

19 नोव्हेंबर कानपूरइंग्लंड टीमची चिंता कमी होताना दिसत नाही. एकीकडे भारताविरूद्ध सलग दोन पराभव झाल्यामुळे इंग्लंड टीम आधीच बॅकफुटवर गेली आहे. त्यातच त्यांचा बॉलर रेयान साईडबॉटम तिस-या वनडे मध्येही खेळू शकणार नाही.साईडबॉटम गेले काही महिने कुठल्या ना कुठल्या दुखापतींनी त्रस्त आहे. साईडबॉटम जूनमध्ये न्युझीलंडविरुद्ध शेवटची वन-डे खेळला होता. त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे तो अ‍ॅण्टींग्वाला झालेली स्टॅण्डफोर्ड स्पर्धा आणि त्यानंतर भारताविरुद्धच्या दोन मॅचेसमध्ये खेळू शकला नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातली तिसरी वन-डे कानपूरमध्ये होणार आहे.

close