पीएसआयचा दारु पिऊन धिंगाणा ; 40 गाड्यांची केली तोडफोड

December 22, 2011 11:17 AM0 commentsViews: 14

22 डिसेंबर

मुंबईत फोर्सवनमध्ये पीएसआय जयवंत जाधव याने मद्यधुंद अवस्थेत सातार्‍यात 40 पेक्षा जास्त गाड्यांची तोडफोड केली. दारु प्यायल्यानंतर जाधव यांनी बिल देणार्‍यावरुन हॉटेल मालकाशी वाद झाला. यावेळी हॉटेल मालकांनी आणि कर्मचार्‍यांनी जाधव यांना हुसकावून लावेल. त्यानंतर तो घरी जात असताना रस्त्यातील गाड्यांची तोडफोड करत गेला. यात जवळपास 40 गाड्या त्याने फोडल्या आहेत. हा प्रकार घडल्यानंतर ज्यांच्या गाड्या या पीएसआयने फोडल्या आहेत त्यांनी जयवंत जाधवला त्याच्या घरी जाऊन बेदम चोप दिला. यात तो जखमी झाल्याने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जाधव हा सध्या मंुबईत फोर्सवन मध्ये पीएसआय पदावर आहे.

close