नियमाचे उल्लंघन करणार्‍या 20 स्कूल बसेसवर RTO ची कारवाई

December 21, 2011 3:37 PM0 commentsViews: 4

21 डिसेंबर

स्कूल बसेसमध्ये सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचा निषेध म्हणून मनविसेनं नवी मुंबईत आंदोलन सुरू केलं आहे. नवी मुंबईतल्या नेरुळ इथल्या डी. ए. व्ही. शाळेवर याविरोधात मोर्चा काढला होता. तसेच, प्राचार्यांना काळं फासलं होतं. या आंदोलनाची दखल अखेर आर.टी.ओनं घेतली. सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍या बसेसवर त्यांनी कारवाई केली. तब्बल, 20 बसेसवर कारवाई करण्यात आली. या सर्व बस मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तातडीने, सर्व नियमांची पूर्तता करा, नाहीतर स्कूल बसेसचा परवाना रद्द करू अशी नोटीस बजावण्यात आली. तर परवाना नसणार्‍या 2 बसेस जप्त करण्यात आल्या आहेत. पण केवळ नोटीस देऊन थांबू नका, तर या बस चालकावर कडक कारवाई करा,अशी मागणी मनविसेनं केली.

close