रणजीत वसिमचा 8 हजार धावांचा रेकॉर्ड

December 22, 2011 2:48 PM0 commentsViews: 1

22 डिसेंबर

रणजी क्रिकेटमध्ये आजचा दिवस रेकॉर्डचा आहे. मुंबईच्या वसिम जाफरने रणजी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जास्त रन करण्याचा रेकॉर्ड केला आहे. याआधी अमोल मुझुमदारच्या नावावर हा रेकॉर्ड होता. अमोलच्या नावावर 8 हजार 237 रन होते. पण आज पंजाब विरुद्धच्या रणजी लीग मॅचमध्ये जाफरने हा रेकॉर्ड मोडला. दुसर्‍या दिवस अखेर वसिम 53 रनवर नॉटआऊट आहे. वसिम भारतासाठीही 31 टेस्ट मॅच खेळला आहे. आणि यात त्याने पाच सेंच्युरी ठोकल्या आहेत.

फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये मात्र वसिम जाफरने 15 हजारच्या वर रन केले आहे. आणि आपल्या फक्त दुसर्‍या रणजी इनिंगमध्ये 314 रन करणारा बॅट्समन म्हणून सगळ्यांना तो ठाऊक आहे. वन डे पंजाबविरुद्धची मॅच त्याची 200 वी फर्स्ट क्लास मॅच होती. आणि आतापर्यंत त्याने 331 इनिंग खेळताना 15 हजार 081 रन केले आहेत. यात तब्बल 44 सेंच्युरी आहेत. तर 73 हाफ सेंच्युरी केल्या आहेत.

close