26/11 हल्ल्याप्रकरणी 9 जणांविरोधात होणार चार्जशीट दाखल

December 21, 2011 5:38 PM0 commentsViews: 1

21 डिसेंबर

मुंबईवर झालेल्या दहशतवादी 26/11 हल्ल्याप्रकरणी 9 आरोपींविरोधात चार्जशीट दाखल करायला केंद्र सरकारने एनआयए (NIA)ला हिरवा कंदील दाखवला आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. अमेरिकेच्या ताब्यात असलेला लष्कर ए तोयबाचा दहशतवादी डोव्हिड हेडली याच्याविरोधात चार्जशीट दाखल केलं जाणार आहे. त्याच्यासोबत आयएसआयसाठी काम करणारे मेजर इक्बाल आणि समीर यांचंही नाव चार्जशीटमध्ये असणार आहे. पुढच्या आठवड्यात ही चार्जशीट दाखल होण्याची शक्यता आहे.

close