बीकेसी मैदानासाठी टीम अण्णांची कोर्टात धाव

December 22, 2011 3:29 PM0 commentsViews: 1

22 डिसेंबर

आज संसदेत नव्याने लोकपाल विधेयक मांडण्यात आलं. पण या विधेयकाला आक्षेप घेत अण्णा हजारे 27 तारखेपासून मुंबईत उपोषणाला बसणार आहे. तीन दिवस हे उपोषण चालणर आहे. पण एमएमआरडीए (MMRDA) मैदानावर सरकारने अण्णांना परवानगी दिली असली तरी त्याचं भाडं खूप असल्याने अण्णा आझाद मैदानात उपोषण करण्याची शक्यता आहे. टीम अण्णांनी मैदानाच्या भाड्यात सवलत मिळवण्यासाठी आता कोर्टात धाव घेतली आहे. आज हायकोर्टात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान, मैदानाचं भाडं कमी करण्याची मागणी करणारा टीम अण्णांचा अर्ज आलाय पण त्यावर निर्णय झाला नसल्याचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.

close