उरळीत गावकर्‍यांच्या आंदोलनामुळे पुणेकरांची कचरा कोंडी

December 22, 2011 8:50 AM0 commentsViews:

22 डिसेंबर

उरळी आणि फुरसुंगीच्या गावकर्‍यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. सलग दोन दिवस कचरा न उचलला गेल्यामुळे ठिकठिकाणी कचर्‍यापेट्या ओसंडुन वहायला लागल्या आहेत. कचरा न उचलला गेल्यामुळे प्रचंड प्रमाणात नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. पण जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहिल अशी भुमिका उरळी आणि फुरसुंगीच्या ग्रामस्थांनी घेतली आहे. साधारण वर्षभरापुर्वी झालेल्या आंदोलनानंतर उरळी आणि फुरसुंगीच्या ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारे कचर्‍याचा प्रश्न सोडवू, तसेच ओपन डंपिंग होऊ देणार नाही. संपूर्ण कचर्‍याचे कॅपिंग करु असं आश्वासन देण्यात आलं होतं. पण एक वर्ष झालं तरी यातल्या एकाही आश्वासनाची पुर्तता झाली नाही. त्यामुळे नागरिकांनी कालपासून कचर्‍याच्या गाड्या अडवल्या आहेत. जोपर्यंत आश्वासन पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. तर कचरा साठल्यामुळे प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचे पुणेकरांचं म्हणणं आहे.

close