नागपूर जिल्ह्यात सात जणांचा आगीत होरपळून मृत्यू

November 20, 2008 4:11 AM0 commentsViews: 1

20 नोव्हेंबर, नागपूर नागपूर जिल्ह्यातल्या मोहनी मोहगावमध्ये एका झोपडीला आग लागून एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली. मृतांमध्ये तीन महिला तसंच चार लहान मुलांचा समावेश आहे. रमेश राऊत यांच्या कुटुंबातील हे सगळे लोक आहेत. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याच अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

close