ओबीसी कोट्यात अल्पसंख्याकांना 4.5 टक्के आरक्षण

December 22, 2011 5:10 PM0 commentsViews: 4

22 डिसेंबर

केंद्रीय मंत्रिमंडळाने ओबीसी कोट्यातच अल्पसंख्याक आरक्षणाला आज मंजुरी दिली. आता 27 टक्के कोट्यात अल्पसंख्याकांना 4.5 टक्के आरक्षण मिळणार आहे. हे आरक्षण शिक्षण आणि सरकारी नोकर्‍यांमध्ये मिळणार आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत मुस्लिम व्होटबँक काबीज करण्यासाठी सरकारने हे पाऊल टाकलं असल्याचं स्पष्ट होतं आहे. तर भाजपने या निर्णयावर कडाडून विरोध केला आहे.

भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामुळे घेर्‍यात सापडलेल्या सरकारने व्होट बँकसाठी फिल्डिंग लावण्यासाठी पाऊल उचलत आहे. आज गुरूवारी अन्न सुरक्षा विधेयक मांडण्यात आले आणि संध्याकाळी अल्पसंख्याकांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा केला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अल्पसंख्याकांना 4.5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे आरक्षण ओबीसीच्या 27 टक्के कोट्यातून मिळणार आहे. यावरुन येत्या निवडणुकीत मुस्लिम समाजाची व्होट बँक मजबूत करण्यासाठी हा निर्णय आहे असं स्पष्ट होतं आहे आणि याला भाजपने आपला विरोध दर्शवला आहे तर बसपाने ही निवडणुकीची रणनिती आहे असं म्हटलं आहे.

close