कार्यकर्ते चुकले, उपोषण बीकेसीवरच – अण्णा

December 23, 2011 10:07 AM0 commentsViews: 2

23 डिसेंबर

एमएमआरडीए मैदानासाठी कार्यकर्त्यांनी कोर्टात जाणे चुकीचे होते त्याचा अतिउत्साह त्यांना नडला आहे पण तरुण कार्यकर्ते आहे त्यांना नविन धडा शिकायला मिळाला आहे अशा शब्दात अण्णांनी कार्यकर्त्यांचे कान उपटले. पण न्यायालय सर्वोच्च आहे त्यांचा निर्णय आम्हाला मान्य आहे आणि त्याचा आदर आहे. येत्या 27 डिसेंबरला उपोषण हे एमएमआरडीए मैदानावर होणार आहे त्यासाठी आता देणगीदार पुढे आले आहे त्यामुळे मैदानाच्या खर्चाचा प्रश्न मार्गी लागला आहे असं अण्णा हजारे यांनी राळेगणमध्ये स्पष्ट केलं.

अण्णा हजारे यांचे उपोषण आता एमएमआरडीए च्या मैदानावरच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मैदान सवलतीच्या दरात मिळावे यासाठी इंडिया अनेन्स्ट करप्शनने नव्याने अर्ज दाखल केला आहे. अण्णांचे उपोषण एमएमआरडीएच्या मैदानावरच होणार हे आता नक्की झालं आहे. एमएमआरडीएचं मैदान सवलतीच्या दरात मिळावे यासाठी टीम अण्णांनी नव्याने अर्ज दाखल केला होता. त्याला एमएमआरडीएने मंजुरी दिली आहे. पाच दिवसांसाठी 7 लाख 78 हजार रुपये भाडं तसेच 5 लाख 39 हजार रुपयांचे डिपॉझिट टीम अण्णांनी भरलं आहे.

close