नवीमुंबईत आणखी 55 स्कूल बसेसवर कारवाई ; 6 जप्त

December 23, 2011 5:17 PM0 commentsViews: 4

23 डिसेंबर

नवी मुंबई आर.टी.ओ.ने नियमांचे पालन न करणार्‍या स्कूल बसेसवर धडक कारवाई सुरू केली आहे. आत्तापर्यंत 55 बसेसवर कारवाई करत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यात तर 6 बसेस जप्त केल्या आहे. मनसेनं या प्रश्नावर नेरुळच्या डी.ए.व्ही. शाळेत आंदोलन केलं होतं. स्कूल बसेस सुरक्षा नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पालक संघटनांकडूनही करण्यात येत होती. स्कूलबसमध्ये प्रथमोपचार पेटी असावी, खिडकीला जाळी असावी, बसमध्ये आग नियंत्रक यंत्रणा असावी असे नियम असताना या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे नवी मुंबई चे आर.टी.ओ. संजय राऊत यांनी सांगितले.

close