डोपिंग प्रकरणी 4 ऍथलीट्स खेळाडूंवर 1 वर्षाची बंदी

December 23, 2011 11:20 AM0 commentsViews: 5

23 डिसेंबर

डोपिंगचा आरोप असलेल्या भारतीय ऍथलीट्स महिलांच्या चारशे मीटर रिले टीमवर अखेर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. नॅशनल डोपिंग एजन्सीच्या आजच्या सुनावणीत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मनदीप कौर, सिनी जोस, अश्विनी आकुंजी आणि युआना मुरमू अशी या ऍथलीट्सची नावं आहेत. या चौघींनी गेल्यावर्षी कॉमनवेल्थ तसेच एशियन गेम्समध्ये रिले शर्यतीत गोल्ड जिंकलं होतं.

पण त्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप पूर्वी ऑगस्टमध्ये झालेल्या उत्तेजक चाचणीत त्या दोषी आढळल्या. कोचनी दिलेल्या गोळ्या आपण औषध म्हणून घेतल्या होत्या, असा दावा या चौघींनी चौकशी दरम्यान केला होता. ऍथलेटिक्स फेडरेशनने कोच युरी ऑगरडॉनिक यांची हकालपट्टीही केली होती. नाडाने नेमलेल्या विशेष समितीने आज ऍथलीट्सनाही या प्रकरणी दोषी धरलं आहे. त्यांच्याकडूनही हलगर्जीपणा झाला हे नाकारता येत नाही असं समितीचं मत पडलं. आणि त्यावरुन त्यांनी एका वर्षाच्या बंदीची शिक्षा सुनावली आहे. मात्र ही बंदी नेमकी कधी सुरु होणार, खेळाडूंना लंडन ऑलिम्पिकमध्ये खेळता येईल का हे अजून समजलेले नाही.

close