शिववड्यासाठी क्वालिटी टेस्ट

November 20, 2008 4:47 AM0 commentsViews: 1

20 नोव्हेंबर, मुंबईगोविंद तुपे शिवसेनेनं शिववडा कार्पोरेट करायचा ठरवलंय, आणि त्याची प्रकिया सुरूही झाली आहे. याचाच एक भाग म्हणून वडापावची आधी परीक्षा घेतली जाणार आहे. यानंतर काही दिवसात शिववडा बाजारात येणार आहे.शिवसेनेनं सुरू केलेल्या शिववडा विक्रीसाठी वडापावला सर्टीफिकेट देणार आहेत प्रसिद्ध शेफ निलेश लिमये. सध्या ते वडापाव स्टॉलधारकांची चाचणी परीक्षा घेत आहेत. 'आम्ही वडापाव मध्ये तीन गोष्टी पहातो. वडा, पाव आणि त्यातली चटणी. यामध्ये आम्ही क्वालिटी आणि चव या गोष्टी बघतो' असं निलेश लिमये यांनी सांगितलं.मुंबईत शिववडाच्या विक्रीसाठी जवळपास दोन हजार अर्ज आलेत. त्यापैकी पन्नास अर्ज हे दादरमधले आहेत. शिववडा स्टॉलसाठी वडापाव विक्रेते कसोशीनं प्रयत्न करत आहेत. 'स्वच्छता, क्वालिटी आणि चव या गोष्टींकडे आम्ही लक्ष पुरवू' असं वैभव म्हात्रे या स्टॉलधारकानं सांगितलं.शिववडा उद्योगासाठी अर्ज भरलेल्या मुंबईतल्या वडापास्टॉल धारकांची लिमयेसह पाच परीक्षक चाचणी परीक्षा घेत आहेत. चोवीस तारखेला शिवाजीपार्कवर होणार्‍या वडासम्मेलनात या वडापाव स्टॉलधारक शिववडा उद्योगाचं सर्टीफिकेट मिळणार आहे. मुंबईत फक्त पंचवीस विक्रेत्यांनाच शिववडा विक्रीचं सर्टिफिकीट दिलं जाणार आहे. कार्पोरेट शिववडा जानेवारी महिन्यात बाजारात आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.

close