धनंजय मुंडे यांचं बंड कायम

December 23, 2011 12:07 PM0 commentsViews: 122

23 डिसेंबर

परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन सुरु झालेलं धनंजय मुंडे यांचं बंड कायम राहिलं आहे. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. धनंजय मुंडे गटाच्या बाजीराव धर्माधिकारी आणि दीपक देशमुख या दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले आहे. त्यामुळे आता नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचा तिरंगी सामना पाह्यला मिळणार आहे. धनंजय मुंडेंचे दोन उमेदवार रिंगणात असतील, तर गोपीनाथ मुंडेंचे समर्थक असलेले जुगल किशोर लोहिया यांना या दोघांशी सामना करावा लागणार आहे. कालच पक्षश्रेष्ठींनी धनंजय मुंडेंना नागपुरात चर्चेसाठी बोलावलं होतं. पण याप्रकरणात पक्षश्रेष्ठींची शिष्टाई कामी आली नाही, असंच दिसतंय.

close