धर्मावर आधारित आरक्षण घटनाबाह्य : भाजप

December 23, 2011 5:52 PM0 commentsViews: 3

23 डिसेंबर

मागासवर्गीय मुस्लिमांसाठी ओबीसी आरक्षणामध्येच आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. धर्मावर आधारित आरक्षण घटनाबाह्य असल्याचे भाजपनं म्हटलं आहे. तर इतका महत्त्वाचा निर्णय सरकारने एवढ्या घाईत का घेतला, असा सवाल डाव्या पक्षांनी विचारला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी मात्र सरकारचा हा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे.

close