अण्णांचे आंदोलन राजकीय पद्धतीने हाताळा – सोनिया गांधी

December 24, 2011 4:31 PM0 commentsViews: 8

24 डिसेंबर

आगामी विधानसभा निवडणुकींचा विचार करून अण्णा हजारे यांचे आंदोलन राजकीय पद्धतीने हाताळा असे आदेश काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकांचा तारीख आज जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी सोनिया गांधींनी काँग्रेस सरचिटणीसांची शुक्रवारी संध्याकाळी बैठक घेतली. त्यात 27 तारखेपासून सुरू होणार्‍या अण्णांच्या आंदोलनावर चर्चा झाली. अण्णांचे आंदोलन सामाजिक नाही तर राजकीय पद्धतीने हाताळा, असे आदेश सोनियांनी दिले. पंजाब, उत्तराखंड तसेच उत्तरप्रदेशात काँग्रेसचा विजय झालाच पाहिजे याची काळजी घ्या, असंही सोनिया म्हणाल्या. काँग्रेसचा विजय हेच अण्णांच्या आंदोलनाला लोकांचं उत्तर असेल, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी अण्णांवर पुन्हा एकदा तोफ डागली. 'अण्णांच्या आंदोलनाचा काँग्रेसला कोणताच फटका बसणार नाही. लोकपाल विधेयक योग्य की अयोग्य हे अण्णा ठरवू शकत नाहीत. त्याची जबाबदारी अण्णांनी संसदेवर सोडावी.' असं दिग्विजय सिंग म्हणाले.

close