परळीत निवडणुकीसाठी भाजपने केला व्हिप जारी

December 24, 2011 9:50 AM0 commentsViews: 3

24 डिसेंबर

परळीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी भाजपने व्हिप जारी केला आहे. जुगलकिशोर लोहिया हेच भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत, असं प्रदेश भाजपने जाहीर केलं आहे. लोहिया यांना मतदान करा, असा व्हीप माजी आमदार केशवराव आंधळे यांनी जारी करावा, असे आदेश पक्षाने दिले आहे. दरम्यान, कुठल्याही परिस्थितीत नगराध्यक्ष भाजपचाच झाला पाहिजे अशी सक्त ताकीद धनंजय मुंडे यांना देण्यात आल्याची माहिती विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दिली. पण, अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी धनंजय मुंडेंच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज कायम ठेवले आहे. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक असलेले जुगलकिशोर लोहिया यांच्या विरुध्द बाकीचे सगळे उमेदवार असा सामना रगणार आहे.

close