हेडलीसह 8 जणांविरोधात चार्जशीट दाखल

December 24, 2011 9:56 AM0 commentsViews: 1

24 डिसेंबर

26/11 हल्ल्याप्रकरणी 9 आरोपींविरोधात एनआयएने चार्जशीट दाखल केले आहे. अमेरिकेच्या ताब्यात असलेला लष्कर ए तोयबाचा दहशतवादी डेविड हेडली याच्यासह 8 जणांची नावं त्यात आहेत. विशेष एनआयए कोर्टात आज चार्जशीट दाखल करण्यात आलं. त्यावर त्याच्यासोबत आयएसआय साठी काम करणारे मेजर इक्बाल आणि समीर यांचंही नाव चार्जशीटमध्ये असणार आहे. पुढच्या आठवड्यात ही चार्जशीट दाखल होण्याची शक्यता आहे.

close