उरळीत आंदोलनामुळे पुणेकरांची कचरा कोंडी कायम

December 24, 2011 10:05 AM0 commentsViews: 7

24 डिसेंबर

पुणे महानगरपालिकेचा फुरसंुगी कचरा डेपोचा तिढा चार दिवसांनंतरही सुटला नाही. महानगरपालिकेला फुरसुंगी आणि उरळी देवाचीच्या ग्रामस्थांसोबत सुरू असलेल्या चर्चेत कोणता ही तोडगा निघु शकला नाही, त्यामुळे शहरात गल्लोगल्लीमध्ये कचर्‍याचे ढीग साचले असून सुमारे अठराशे टनच्यावर कचरा शहराच्या कचराकंुडीत पडून असल्याने पुणेकरांचे स्वास्थ धोक्यात आलं आहे. तर जोपर्यंत आोपन डंपिग कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात येत नाही आणि फुरसुंगी आणि उरळी देवाचीच्या लोकांच्या स्वास्थाची पालिका काळजी घेत नाही तोपर्यंत कचरा बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा फुरसुंगी आणि उरळी देवाचीच्या ग्रामस्थांनी दिला आहे. तर पालिकेनं शहराच्या सभोवताली असलेले प्रस्थावित चार कचरा डेपो तयार केले असते तर फुरसुंगी आणि उरळीच्या लोकांचा कचर्‍याचा प्रश्नच उदभवला नसता, असं भाजपचे पुणे शहराध्यक्ष विकास मठकरी यांनी म्हटलं आहे.

close