संघाच्या शिक्षण संस्थांवर केंद्र नजर ठेवणार

November 20, 2008 4:55 AM0 commentsViews:

20 नोव्हेंबर, दिल्लीमालेगावचं बाँबस्फोट आणि ख्रिश्चनांवर झालेल्या हल्ल्यांनंतर आता , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या शिक्षण संस्थांवर केंद्र सरकार करडी नजर ठेवून आहे. अशा शाळांबरोबरच मदरशांमध्येही दिल्या जाणार्‍या शिक्षणाचा आढावा घेण्यात येणार आहे. मालेगावचे बाँबस्फोट, ख्रिश्चनांविरोधात कर्नाटक आणि ओरिसात झालेली हिंसा आणि या सगळ्याला कारणीभूत म्हणून नावं घेतली जात आहेत ती बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि अभिनव भारत यांची. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय खत मंत्री राम विलास पासवान यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. राम विलास पासवान यांनी मानव संसाधन आणि विकास मंत्री अर्जुनसिंग यांना पत्रही लिहिलं आहे. 'संघ परिवाराच्या शाळांमध्ये तरुण मुलांचं ब्रेन वॉशिंग केलं जातं. त्याचाच परिणाम हिंसात्मक कारवायात होतो' त्यांनी लिहिलं आहे.केंद्रीय शिक्षण सल्लागार समितीनं आरएसएसच्या शिशूमंदीर तसच मदरशांवरही रिपोर्ट तयार केला आहे. सीएनएन आयबीएनला मिळालेल्या माहितीनुसार आता राष्ट्रीय पाठ्यपुस्तक समिती स्थापन करून, सरकार अशा बिगर सरकारी शिक्षण संस्थांच्या पाठ्यपुस्तकांवर वचक ठेवणार आहे. अर्थात आधी हा प्रस्ताव बस्त्यातच होता, पण आघाडीतील घटक पक्षांच्या दबावामुळं पंतप्रधानांचं कार्यालयही याबाबतीत सजग झालं आहे. केंद्र आता प्रस्तावाचा गंभीरतेन विचार करत असून , अर्जुन सिंग यांनाही त्यांच्या सहकार्‍यांकडून पाठिंबा मिळत आहे.

close