बब्बर खालसाच्या 2 संशयित दहशतवाद्यांना अटक

December 23, 2011 4:42 PM0 commentsViews: 1

23 डिसेंबर

दिल्ली पोलिसांनी बब्बर खालसाच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केलीय. जसविंदर सिंग आणि सर्वप्रीत सिंग असं या संशयीत दहशतवाद्यांचे नाव आहे. या दोघांनाही 10 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 3 पिस्टल आणि काही मोबाईल फोन्स जप्त केले आहेत. त्यातल्या एकाला पंजाब आणि दुसर्‍याला दिल्लीतून अटक करण्यात आलीय. पोलिसांच्या म्हणण्यानुसार काही धार्मिक नेत्यांची हत्या करण्याचा त्यांचा कट होता.

close