वाळू माफियांकडून ठेकेदारांना बेदम मारहाण

December 24, 2011 12:57 PM0 commentsViews: 45

24 डिसेंबर

रत्नागिरीत वाळू व्यापार्‍यांमधला संघर्ष शिगेला पोहोचला आहे. दाभोळ खाडीत अनधिकृत रित्या वाळू उपसा करणार्‍यांविरोधात अधिकृत ठेकेदारांनी तक्रार दिली होती. त्याचा राग म्हणून हातपाटी वाळू व्यापार्‍यांकडून तक्रारदारांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली आहे. जखमींवर डेरवणमधल्या हॉस्पिटलमध्ये आयसीयत उपचार सुरू आहेत. चार कोटी रुपयांहून जास्त महसूल भरुन या ठेकेदारांनी वाळू उपशाची परवानगी घेतली होती. पण अवैध वाळू उपशामुळे या अधिकृत ठेकेदारांचे मोठं नुकसान होत होतं. याविरोधात चिपळूणच्या तहसीलदार आणि रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करण्यात आली होती. प्रशासकीय अधिकारी अवैध वाळू उपसा करणार्‍यांना पाठिंबा देत असल्यामुळे हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

close