ज्येष्ठ रंगकर्मी सत्यदेव दुबे काळाच्या पडद्याआड

December 25, 2011 12:18 PM0 commentsViews: 7

25 डिसेंबर

ज्येष्ठरंगकर्मी सत्यदेव दुबे यांचं आज दुपारी दीर्घ आजारानं निधन झालं. प्रायोगिक रंगभूमीसाठी त्यांनी अलोट योगदान दिलं. अनेक कलाकारांना त्यांनी घडवलं. कडक शिस्तीचे रंगभूमीचे मास्तर अशीच त्यांची रंगकमीर्ंमध्ये ओळख.

छत्तीसगडमधल्या बिलासपूर इथे 1936 साली त्यांचा जन्म झाला. अंकु र , निशांत या चित्रपटाचे संवाद त्यांनी लिहिले, त्याचबरोबर अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा लेखनही केलं होतं. दुबे यांचं पार्थिव कूपर हॉस्पिटलमधून घरी आणण्यात आल्यानंतर साहित्य सहवास इथल्या घरी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसस्कार झाले. नसिरुद्दीन शाह, गोविंद निहलानी, मीता वसिष्ठ, स्वानंद किरकिरे,विजय केंकरे, अरुण काकडे, संदेश कुलकर्णी, अमृता सुभाष ,निखिल रत्नपारखी यांच्यासह अनेक रंगकर्मी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित आहेत .

सत्यदेव दुबे यांचा सन्मान संगीत नाटक अकादमी पुरस्कार 'भूमिका'च्या पटकथेसाठी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार 'जुनून'च्या पटकथेसाठी फिल्मफेअर पद्मविभूषण पुरस्कार

close