नांदेडमध्ये सीआरपीएफ कॅम्पमध्ये स्फोट ; 1 ठार

December 25, 2011 12:34 PM0 commentsViews: 5

25 डिसेंबर

नांदेडमधल्या मुदखेडमध्ये सीआरपीएफ (CRPF) कॅम्पमध्ये स्फोट झाला. जाभंळी तांडा इथल्या फायरींग रेंजमध्ये हा स्फोट झाला. यात 1 जण जागीच ठार तर 9 जण जखमी झाले. या स्फोटात एका 14 वर्षांच्या मुलाचाही यात मृत्यू झाला. सतीश शेषराव राठोड असं या मुलाचं नाव आहे. तर झारखंडचा अभिषेक कुमार सिंह या जवानाचाही स्फोटात मृत्यू झाला. बॉम्ब हाताळण्याचे प्रशिक्षण देत असतानाच ही घटना घडली. या स्फोटात एकुण 9 जण जखमी झाले आहे. यामध्ये 10 ते 18 या वयोगटातील चार मुलांचा समावेश आहे. जखमी जवानांना मुदखेड आणि नांदेडच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

close