फुरसुंगीच्या गावकर्‍यांचे आंदोलन मागे

December 25, 2011 1:36 PM0 commentsViews: 1

25 डिसेंबर

पुणे महानगरपालिकेचा फुरसंुगी कचरा डेपोचा तिढा पाच दिवसानंतर सुटला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या मध्यस्तीनंतर हा तिढा सुटला आहे. सहा महिन्यात हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन सुळेंनी गावकर्‍यांना दिले आहे. त्यासाठी एका मॉनिटरींग कमिटीची स्थापना त्यांनी केली. मागील पाच दिवसांपासून फुरसुंगी आणि उरळी देवाचीच्या ग्रामस्थांचे कचरा बंद आंदोलन सुरु होतं. त्यामुळे पुण्यात कचर्‍याचे ढीग साचले होते. पण आता सुप्रिया सुळेंच्या मध्यस्थीमुळे गावकर्‍यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे.

close