धनंजय मुंडेंनी पक्षादेश झुगारला

December 25, 2011 1:42 PM0 commentsViews: 1

25 डिसेंबर

गोपीनाथ मुंडेंविरोधात बंड करणार्‍या धनंजय मुंडे यांनी आता थेट पक्षालाच आव्हान दिलं आहे. भाजपच्याच उमेदवाराला मतदान करा असा व्हीप पक्षाने काढला असतानाही आता धनंजय मुंडे यांनी आपल्या गटातील बारा नगरसेवकांना पक्षादेश झुगारुन अपक्ष उमेदवार दीपक देशमुख यांनी मतदान करण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान आज गोपीनाथ मुंडे समर्थक नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला 17 पैकी 7 नगरसेवक या बैठकीला हजर होते. यावेळी गटनेता म्हणून अरुण टाक यांची निवड करण्यात आली.

close