मंदीचा पर्यटनालाही फटका

November 20, 2008 5:04 AM0 commentsViews: 1

20 नोव्हेंबर, मुंबईनेहा आनंदजागतिक मंदीमुळं पर्यटकांची संख्या कमी झालीय. ट्रॅव्हल कंपन्यांना नव्या कॉर्पोरेट बिझनेस टूर्स मिळेनाशा झाल्यात. मंदीमुळं त्यांच्याकडचं बुकिंग 50 टक्केचं झालंय. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या आता नवी शक्कल लढवत आहेत. 'कन्वेन्शन, कॉन्फरर्न्स, इव्हेंन्ट आणि ग्रुप बुकिंगवर सध्या आम्ही जास्त लक्ष देतोय' असं प्लॅनेट अर्थ हॉलिडेजचे चेअरमन शशांक दोषी यांना सांगितलं. सगळ्याच ट्रॅव्हल एजन्सींनी सुद्धा खर्च कमी करायला सुरूवात केली आहे. या कंपन्यांनी वेबसाईट आणि नव्या शाखा उघडण्याचा प्लॅनही सध्या लांबणीवर टाकला आहे. ट्रॅव्हल एजंन्ट्सना एअरलाईन्स कंपन्यांकडून मिळणारं कमिशनही बंद केलं आहे. त्यामुळे एजन्ट्सही एअर बुकिंग करण्याऐवजी पॅकेज विकण्यावर भर देत आहेत.मंदीच्या काळात लोकं गरजेच्या वस्तूंवरचं खर्च करत आहेत. त्यामुळं एखादी टूर आखणं लोकांना परवडणारं नाही. पण त्याचा फटका ट्रॅव्हल कंपन्यांना बसतोय. एकूणच मंदीच्या तडाख्यापासून ट्रॅव्हल इंडस्ट्रीही सुटली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

close