अण्णांची तब्येत फिट ; मुंबईत संध्याकाळी आगमन

December 26, 2011 10:05 AM0 commentsViews: 5

26 डिसेंबर

सक्षम लोकपाल विधेयकासाठी उद्यापासून अण्णा हजारे यांचे पुन्हा उपोषण सुरू होतं आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून अण्णांना सर्दी ताप असल्याने अण्णांची प्रकृतीबाबत चर्चा सुरू आहे. पण आज सकाळी डॉक्टांनी अण्णांची तपासणी केली. अण्णांना थोडा थकवा असला तरी त्यांच्या तब्येतीत खूप सुधारणा आहे. आज त्यांना ताप नाही. अशी माहिती डॉक्टरांनी दिली. त्याचबरोबर नियोजित कार्यक्रमाप्रमाणेच अण्णा दुपारी आळंदीला ज्ञानेश्वरांच्या समाधीचे दर्शन घेऊन मुंबईकडे निघतील असंही त्यांनी सांगितले आहे.

राळेगण ते मुंबई…- दु. 3 च्यासुमारास अण्णा राळेगणहून निघणार- दु. 4. 00 – आळंदी – ज्ञानेश्वर समाधी दर्शन- आळंदी दर्शनानंतर मुंबईकडे – मुंबईत संध्याकाळी आगमन- आयोजनाबाबत कार्यकर्त्यांंशी चर्चा- मुंबईत मुक्काम

close