‘घाशिराम’ला शरद पवारांची दाद

December 26, 2011 1:08 PM0 commentsViews: 10

26 डिसेंबर

राज्य आणि देशाच्या राजकरणात सदैव व्यस्त असणारे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना थोडा वेळ मनोरंजनाकरिता निवांत बसण्याची संधी मिळाली.निमित्त होतं घाशिराम कोतवाल या नाटकाच्या प्रयोगाचं..घाशिराम कोतवाल या प्रसिध्द नाटकाने नुकत्याच चाळीसव्या वर्षात पर्दापण केलं आहे.आणि गेल्या चाळीस वर्षापासून रसिकांनी या नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या नाटकाच्या टीमला निर्माते, अभिनेते आणि अभिनेत्री यंाना प्रोत्साहीत करण्याकरिता शरद पवारांनी स्वत: या नाटकाचा पूर्ण प्रयोग पाहिला. यावेळी शरद पवार याच्या पत्नी प्रतिभाताई पवार सुध्दा हजर होत्या.

close