वसईत ख्रिसमसची धूम

December 25, 2011 2:58 PM0 commentsViews: 3

25 डिसेंबर

वसईत ख्रिसमसचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिसमसच्या पूर्व संध्येला वसईतील सर्वच चर्चेसमध्ये प्रार्थना केली जाते. यालाच ख्रिश्चन बांधव मिसा असं म्हणतात. मिसाच्यावेळी तरुणांनी ख्रिस्ताची गाणी म्हटली. तालुक्यात जवळ जवळ 22 चर्च आहेत. ही सगळी चर्चेस रोषणाईनं सजवण्यात आली आहेत. वसईतल्या सेंट मायकल चर्चमध्ये मध्यरात्रीच्या मिसासाठी अलोट गर्दी जमा झाली होती. ख्रिसमसाचा हा सण साजरा केला जातो तो जगाला शांती आणि प्रेम मिळावे म्हणून. येशू ख्रिस्त हा एक प्रकाश असून अंधारावर मात करण्यासाठी प्रभू येशूचा जन्म झाल्याची श्रद्धा ख्रिस्ती बांधवामध्ये आहे. यानिमित्ताने वसईत अनेक ठिकाणी छोटे गोठे तयार केले जातात. येशूचा जन्म हा गोठ्यात झाला. त्यामुळे प्रतिकात्मक गोठे तयार करण्यात येतात . हे मोठं विलोभनीय दृश्य असतं.

close