नव्यावर्षाच्या सुरवातीला पेट्रोल 1 रुपयाने महागणार ?

December 25, 2011 4:48 PM0 commentsViews: 4

25 डिसेंबर

गेल्या महिन्याभरापासून पेट्रोल दरवाढीपासून निश्चित असलेल्या सर्वसामान्य जनतेला ऐन नव्यावर्षाच्या सुरुवातीपासून पेट्रोलच्या किंमतीमध्ये एका रुपयानं वाढ होण्याची शक्यता आहे. डॉलरच्या तूलनेत रूपयाची किंमत घसरल्याचा हा परिणाम आहे. सरकारकडून याबाबत अजून कोणतीही घोषणा झालेली नाही. येत्या 31 डिसेंबरपर्यंत तेल कंपन्या यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. आतराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किंमतीत रुपायाची घसरण सुरुच आहे. त्यामुळे पेट्रोलच्या क्रुडतेलात पेट्रोल कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे नव्यावर्षात ही एका रुपयाची भेट मिळण्याची शक्यता आहे.

close