लोअर परेलच्या पोदार मिलला आग

November 20, 2008 5:19 AM0 commentsViews: 1

20 नोव्हेंबर, मुंबईमुंबईत लोअर परेल इथल्या पोदार मिलला काल रात्री आग लागली . ना. म. जोशी मार्गावर असलेल्या या मिलच्या सिव्हिंग आणि विव्हिंग भागात ही आग लागली होती. या ठिकाणी कपडे आणि धाग्याचे गोडाऊन असल्याने आग झपाट्यानं पसरली. आगीचं वृत्त कळताच फायर ब्रिगेडचे दहा फायर इंजिन्स आणि दहा टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागली असल्याचं फायर ब्रिगेडचं म्हणंणं आहे.

close