समता सैनिकांनी दाखवले अण्णांना काळे झेंडे

December 27, 2011 5:54 AM0 commentsViews: 2

27 डिसेंबर

सक्षम लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे मुंबईत तीन दिवस उपोषण करत आहे. आज सकाळी अण्णा नियोजित ठरल्याप्रमाणे जुहू चौपटीकडे महात्मा गांधींच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी निघाले होते. यावेळी जुहूजवळ त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी अण्णांना काळे झेंडे दाखवले. अण्णांचा निषेध करत, त्याचबरोबर अण्णा हजारे मुर्दाबादचे नारे देत आंदोलनाला विरोध केला. अण्णांचे हे आंदोलन घटनाविरोधी असल्याचा आरोप या कार्यकर्त्यानी केला.

close