दुरुस्त्या स्वीकारा नाहीतर विधेयक मागे घ्या – सुषमा स्वराज

December 27, 2011 11:13 AM0 commentsViews: 1

27 डिसेंबर

आज संसदेत बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित लोकपाल विधेयकावर चर्चा होतं आहे. सरकारी लोकपाल विधेयकावर विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी कडाडून टीका केली. लोकपाल विधेयकाबद्दल भाजपनं सुचवलेल्या दुरुस्त्या स्वीकारा नाही तर विधेयक मागे घेऊन स्थायी समितीकडे पाठवा अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केली. तसेच लोकपालमधील आरक्षण घटनेच्या चौकटीत मोडत नाही घटनात्मक पदासाठी आरक्षणाची तरतूद नाही मात्र लोकपालमध्ये धर्मावर आधारीत आरक्षण दिलं गेलं आहे. लोकपालच्या 9 सदस्यीय समितीतील 5 सदस्यासाठी आरक्षणाची तरतूद केली आहे. त्यामुळे घटनेत धर्मआधारीत आरक्षणाला वाव नाही आरक्षणशिवाय अनेक जणांनी घटनात्मक पद भूषवलं आहे याचा दाखला देत स्वराज यांनी 12 राष्ट्रपतीपैकी 4 जण मुस्लीम होते याची आठवणही करुन दिली.

close