पुतण्या जिंकला, काकांना धक्का

December 26, 2011 1:01 PM0 commentsViews: 12

26 डिसेंबर

परळीच्या नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या सामन्यात अखेर पुतण्याने काकावर मात केली आहेत. बंडखोर धनंजय मुंडे यांचा उमेदवार दीपक देशमुख परळीचे नवे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. गोपीनाथ मुंडेचे उमेदवार जुगलकिशोर लोहिया अखेर पराभूत झाले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत घेऊन, धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंवर बाजी पलटवली आहे. त्यामुळे गोपीनाथ मुं़डेंच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. दीपक देशमुख तब्बल 26 विरुध्द 6 मतांनी निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपला परळीत चांगलाच धक्का बसला आहे. बंड न केलेल्या काही नगरसेवकांनीही धनंजय यांच्या उमेदवारालाच मत दिल्याचंही यातून स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, पक्षाचा व्हीप झुगारणार्‍या भाजप नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई होणार असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. धनजंय मुंडे समर्थक नगरसेवकावंर दोन दिवसात नोटीस बजावली जाणार आहे. सात दिवसाच्या आत या नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल. तर धनजंय मुंडे यांच्याबाबतचा निर्णय केंद्रीय अनुशासन समितीकडे सोपवल जाणार आहे, असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

close