एमएमआरडीए मैदानावर उपोषणाची जोरदार तयारी

December 26, 2011 9:42 AM0 commentsViews: 1

26 डिसेंबर

अण्णांच्या उपोषणासाठी मुंबईतही जय्यत तयारी सुरु आहे. अण्णा हजारे 27 तारखेपासून एमएमआरडीएच्या मैदानावर तीन दिवसांचे उपोषण करणार आहेत. त्यासाठी स्टेज, अण्णांच्या निवासाची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, स्वच्छतागृह, सुरक्षेच्या दृष्टीने ऍम्बुलंस आणि फायर ब्रिगेडच्या गाड्यांची तयारी सुरु झाली आहे. मीडियासाठी आणि पार्किंगसाठीसुद्धा स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. आंदोलनाची तयारी

-25 हजार माणसांची क्षमता- 30हजार स्के.फूट जागेपैकी 10 हजार स्के.फूट जागा पार्किंगसाठी- 3 दिवसांसाठी फायर इंजिन, खर्च 3.5 लाख रु.- 1 एन्ट्री गेट- 6 आपत्कालीन एक्झीट- 6 मेटल डीटेक्टर्स- 16 फायर एक्स्टींग्वीशर- कार्यकर्त्यांसाठी बीकेसीमध्ये निवासाची व्यवस्था- तीन दिवस अहोरात्र 2000 पोलिसांचा पहारा- 2000 पोलिस कॉन्स्टेबल तैनात- 200 पोलिस सब-इन्सपेक्टर- 6 एसआरपीएफ च्या तुकड्या- 3 ऍन्टी टेरर क्वीक रिस्पॉन्स टीम- 2 बीडीडीएस स्क्वॉड

close