भाजपला अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन निवडणुका जिंकायच्या – सिब्बल

December 27, 2011 11:52 AM0 commentsViews: 1

27 डिसेंबर

लोकपाल विधेयकावर संसदेत चर्चा होतं आहे एकीकडे विरोधी पक्ष सरकारी लोकपालला विरोध दर्शवत आहे तर सत्ताधारी नेते विरोधकांना प्रतिउत्तर देतं आहे. भाजप राज्यात भ्रष्टाचाराला अभय देत आहे त्यांना प्रत्येक राज्यात मुख्यमंत्र्यांकडून लोकायुक्तांची निवड हवी आहे यासाठी ते अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन निवडणुका जिंकायची स्वप्न पाहत आहे अशी टीका कपिल सिब्बल यांनी केली. तसेच भाजपशासित राज्यात लोकायुक्त आणण्यास कुणी अडवलंय ? तिकडे नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये गेल्या 9 वर्षांपासून लोकायुक्ताची निवड झाली नाही असा दाखलाही सिब्बल यांनी दिला. तसेच जर लोकपाल विधेयक पारीत झाल्यास हा क्षण इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहीला जाईल मात्र फेटाळले गेले तर जनता आपल्याला माफ करणार नाही त्यामुळे भाजपने राजकारण न करता लोकपालच्या मार्ग मोकळा करावा असा इशाराही सिब्बल यांनी दिला.

close